Boxing World Olympic Qualifiers 2024 : बाॅक्सिंगपटू निशांत देवनं मिळवले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट…

Boxing World Olympic Qualifiers 2024 : भारताच्या निशांत देवने (Nishant Dev) शुक्रवारी बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून पुरुषांच्या 71 किलो वजनी गटात भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला.
पॅरिस 2024 साठी बॉक्सिंगमधला हा भारताचा चौथा कोटा आहे पण पुरुषांच्या गटातील हा पहिलाच कोटा आहे. मागील पात्रता स्पर्धेतील अपयशाचे त्याने आता यशात रूपात केले आहे. यावेळेस त्याने उपांत्यपूर्व फेरीत मोल्दोव्हाच्या व्हॅसिल सेबोटारीचा 5-0 ने पराभव करून कोटा मिळवला.
#ParisOlympics Quota Alert🚨#TOPSchemeAthlete & 🇮🇳’s ⭐pugilist Nishant Dev books a ticket for #Paris2024 at the 2⃣nd Boxing🥊 World #Olympic Qualifiers held at 🇹🇭.
The Indian won 5-0 against Moldova’s Cebotari in the QFs
You got this Nishant💪 *LET’S GO*😍@BFI_official… pic.twitter.com/2y9KUTecIL
— SAI Media (@Media_SAI) May 31, 2024
यापूर्वी, निशांतला मार्चमध्ये इटलीतील बुस्टो अर्सिझियो येथे झालेल्या पहिल्या जागतिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत कोटा मिळवण्यात अपयश आले होते, त्यादरम्यान त्याला उपांत्यपूर्व फेरीत वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 च्या रौप्यपदक विजेत्या अमेरिकेच्या ओमारी जोन्सविरुद्ध 1-4 असा पराभव पत्करावा लागला होता.
Singapore Open 2024 : भारताच्या ‘त्रिशा-गायत्री’चा विजयी धडाका सुरूच, उपांत्य फेरीत मारली धडक….
टोकियो 2020 कांस्यपदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन (महिला 75 किलो), दोन वेळची जगज्जेती निखत झरीन (महिला 50 किलो) आणि प्रीती पवार (महिला 54 किलो) यांनी गेल्या वर्षी हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी इतर तीन ऑलिम्पिक कोटा प्राप्त केले आहेत.





