GREAT NEWS : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत

टोक्यो – टोक्यो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये भारतीय बॉक्सर सतीश कुमारने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने १६व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला ४-१ ने पराभूत केले. सतिशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत.
पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली. तर, दुसऱ्या फेरीत त्याने अप्रतिम राईट हूक आणि बॉडी शॉट्स वापरून रिकोर्डोला चित केले. पहिल्या दोन फेरीत सतीशने रिकार्डोला गारद केल्याने तिसऱ्या फेरीत सतीशचा सामना करणं त्याला जवळपास अशक्य झालं. मात्र आघाडी घेतली असतानाही सतीशने कुठलाही धोका न पत्करता चतुराईने खेळत सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. सतीश कुमार मुळचा बुलंदशहरमधील पचौता गावचा आहे.
सतीशकुमारची वाटचाल…
वर्ष – 2010- उत्तर भारत एरिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक
वर्ष 2011 – नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक
वर्ष 2014 – आशियाई खेळामध्ये कांस्य पदक
वर्ष 2015 – आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक
वर्ष 2018 – कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक नावावर केले होते.





