नवी दिल्ली – भारताची जागतिक विजेती महिला मुष्टियोद्धा निखत झरिन हीने येथे सुरु असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. केवळ नविखतच नव्हे तर स्टार खेळाडू नितू घंघास, मनिषा मौन, जस्मिन लंबोरिया यांनीही या फेरीत थाटात प्रवेश केला आहे. नवोदित शशी चोप्रा हीला मात्र, पराभवाचा सामना करावा लागला.
गतविजेत्या निखतने 50 किलो वजनी गटात मेक्सिकोच्या फातिमा हिरेरा हिच्यावर सहज मात केली. या लढतीत फातिमाने निखतवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला मात्र, निखतच्या आक्रमक खेळापुढे ती निष्प्रभ ठरली. नीतू हिने 48 किलो वजनी गटात ताजिकिस्तानच्या सुमैया कोसीमोवा हिच्यावर विजय मिळवला.
Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत
मनीषा हिने 57 किलो वजनी गटात तुर्कीच्या नूर तूरहान हिच्यावर मात केली. गेल्या स्पर्धेत मनीषाने ब्रॉंझपदक मिळवले होते परंतू यंदा तीचे लक्ष्य सुवर्णपदकाचेच आहे. अन्य सामन्यात जास्मिनने 60 किलो वजनी गटात ताजिकिस्तानच्या मिजगोना सामादोवा हिला 5-0 असे पराभूत करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.