Border-Gavaskar Trophy 2024/25 : केएल राहुलने दुखापतीबाबत स्वत: दिले अपडेट; जाणून घ्या, पर्थ कसोटीत खेळणार की नाही….

IND vs AUS (Perth Test KL Rahul Injury Update) : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारतीय चाहत्यांना दोन मोठे धक्के सहन करावे लागले. या ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्याचा पहिला सामना 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थमध्ये खेळवला जाईल. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच सराव सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज केएल राहुल आणि शुभमन गिल दुखापत झाल्याची बातमी आली होती. पण आता खुद्द केएल राहुलने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओद्वारे त्याच्या दुखापतीचे अपडेट शेअर केले आहेत.
बीसीसीआयने रविवारी केएल राहुलच्या सरावाचा व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये तो आरामात फलंदाजी करताना दिसत आहे. बीसीसीआयचे फिजिओ कमलेश जैन आणि योगेश परमार यांनीसुध्दा त्याच्या फिटनेसबद्दल माहिती दिली आहे. कमलेश जैन म्हणाले, “राहुलच्या कोपरात फ्रॅक्चर किंवा हाडांशी संबंधित कोणतीही समस्या नाही.” दरम्यान, योगेश परमार म्हणाले, “आम्ही त्याचा एक्स-रे काढला आणि स्कॅन केले. त्यात कोणतीही समस्या समोर आलेली नाही. वैद्यकीय दृष्टिकोनातून तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.”
After being hit on his elbow on Day 1 of the match simulation, KL Rahul has recovered and is raring to go 👌👌#TeamIndia | #AUSvIND | @klrahul pic.twitter.com/FhVDSNk8tv
— BCCI (@BCCI) November 17, 2024
राहुलने दिली प्रतिक्रिया…
आपल्या तंदुरुस्तीबद्दल समाधान व्यक्त करताना केएल राहुल म्हणाला, “मला चांगले वाटत आहे आणि पहिल्या कसोटीसाठी मी पूर्णपणे तयार आहे. येथे सरावासाठी लवकर आल्याचा फायदा मला झाला. आता मी मालिकेसाठी खूप उत्सुक आहे.”
केएल राहुलला दुखापत कशी झाली?
शुक्रवारी, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या सराव सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा एक चेंडू त्याच्या कोपरावर आदळला, त्यानंतर दुखण्यामुळे त्याने मैदान सोडले होते.





