सातारा – दीपलक्ष्मी सभागृहामध्ये उद्यापासून पुस्तक प्रदर्शन
Updated On:

सातारा – येतील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि पुस्तक पर्व ग्रंथ भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपासून (दि. 12) दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली.
प्रदर्शनाचे उदघाटन सोमवारी दुपारी ४ वाजता प्राचार्य यशवंत पाटणे यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यातील दिलीपराज प्रकाशन संस्थेच्या पुस्तकांसह अन्य प्रकाशनांची विविध विषयांवरील लोकप्रिय तसेच दुर्मिळ पुस्तके या प्रदर्शनात 25 ते 40 टक्के सवलतीत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. पाच हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. सकाळी दहा ते रात्री आठ अशी प्रदर्शनाची वेळ असून प्रदर्शन शुक्रवार दि. 23 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे, असे शिरीष चिटणीस यांनी सांगितले.





