लंडनवरून हैदराबादला येणाऱ्या विमानात बॉम्बची अफवा !

London | Hyderabad – लंडनवरून हैदराबादला जाणारे लुफ्तान्सा विमान कंपनीचे विमान काल अर्ध्या वाटेतूनच माघारी गेले आणि फ्रॅन्कफर्ट विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानाला भारतात उतरण्याची परवानगी मिळू शकली नाही, असे कारण सर्व प्रवाशांना देण्यात आले.
मात्र सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या बॉम्बच्या धमकीमुळे विमान माघारी बोलावण्यात आल्याचे लुफ्थांसाने एका निवेदनात म्हटले आहे. दिनांक १५ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:०१ वाजता हैदराबाद विमानतळावर लुफ्थांसाच्या विमानाला लक्ष्य करणाऱ्या बॉम्ब धोक्याचा ईमेल प्राप्त झाला होता, असे हैदराबादमधील विमानतळ सूत्रांनी सांगितले होते.
एलएच ७५२ हे विमान जर्मनीतल्या परॅन्कफर्ट विमानतळावरून हैदराबादकडे जाण्यासाठी दुपारी सव्वा २ वाजता निघाले. हे विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (सोमवारी) उतरणे अपेक्षित होते.
मात्र उड्डाण केल्यानंतर काही तासातच विमान माघारी गेले होते. फ्रॅन्कफर्ट विमानतळावरच सर्व प्रवाशांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती. आज पहाटे सुधारीत वेळापत्रकानुसार विमान भारताकडे निघण्याचे ठरले असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.





