जम्मू-काश्मीरमध्ये बुरखाधारी व्यक्तीकडून सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब हल्ला

काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया खाई केल्या कमी होत नाही. मागील एकही दिवसांपासून तर दहशतवादी हल्ले होताना दिसून येत आहेत. याच घटनेत आणखी एक भर पडली असून काल संध्याकाळी एका दहशतवाद्याने सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब फेकून हल्ला केला आहे. विशेष म्हणजे हा हल्ला एका बुरखाधारी व्यक्तीने केला असल्याचे समोर आले आहे. या घटनेचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकून घातपात करायचा प्रयत्न केला. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून तिचा शोध घेऊन तिला लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्हीच्या व्हिडिओ फुटेजमध्ये दुचाकी वाहने जात असलेला रस्ताही दिसतो. पुढे यामध्ये बुरखा घातलेली एक व्यक्ती येते आणि रस्त्याच्या मधोमध थांबते. कोणतीतरी एखादी वस्तू ती आणलेल्या पिशवीतून बाहेर कडून त्यानंतर ती व्यक्ती तो बॉम्ब फेकते आणि लगेच घटनास्थळावरून पळून जाते.
या घटनेमुळे हैराण नागरिकही परिसरातून पळ काढताना दिसून येत आहेत. या पेट्रोल बॉम्बमुळे लागलेली आग विझवण्यासाठी काही जण पाण्याच्या बादल्या आणताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आणि दहशत निर्माण झाली आहे.




