Tabu and Nagarjuna : तब्बू आणि नागार्जूनची जोडी तब्बल 28 वर्षानंतर एकत्र; पाहायला मिळणार नवा ट्विस्ट
Tabu and Nagarjuna : ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. परंतु, या चित्रपटात तब्बू खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातं. याधीच्या चित्रपटात तब्बू-नागार्जुनचा लव्ह अँगल पाहायला मिळाला होता, पण यावेळी प्रेम नाही तर दोघांमधील संघर्ष आणि वाद पाहायला मिळतील.

Tabu and Nagarjuna : अभिनेत्री तब्बूने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. हिंदीसह इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
तब्बूने १९९८ मध्ये साऊथ स्टार अभिनेते नागार्जून यांच्यासोबत ‘आविदा मां आविदे’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता तब्बल 28 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. (Tabu and Nagarjuna)
‘किंग100’ या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. परंतु, या चित्रपटात तब्बू खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातं. याधीच्या चित्रपटात तब्बू-नागार्जुनचा लव्ह अँगल पाहायला मिळाला होता, पण यावेळी प्रेम नाही तर दोघांमधील संघर्ष आणि वाद पाहायला मिळतील. (Tabu and Nagarjuna)

Tabu and Nagarjuna : तब्बू आणि नागार्जूनची जोडी तब्बल 28 वर्षानंतर एकत्र; पाहायला मिळणार नवा ट्विस्ट
दरम्यान, ‘किंग 100’ चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, वृत्तांनुसार, तब्बू या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसू शकते. यापूर्वी एकत्र काम केल्यामुळे ही जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रिन कपल म्हणून एकत्र येईल अशी अनेकांना अपेक्षा होती. (Tabu and Nagarjuna)
मात्र, यात दोघे विरोधी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘अन्नपूर्णा स्टुडिओज’च्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटात नागार्जुन आणि तब्बू यांच्यासोबत सुष्मिता भट्ट देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Tabu and Nagarjuna)
हेही वाचा:





