Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी
Kareena Kapoor Khan : करीनाची मजेशीर प्रतिक्रिया

Kareena Kapoor Khan : बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर खान तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सुरू आहे. याच कारण म्हणजे सोशल मीडियावर तिचा जीमच्या बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली. अशात आता करीना कपूर खानने सोशल मीडियावर एका मिश्किल पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा ‘बेबी बंप’ दिसत असल्याचा दावा करण्यात आला. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याचा अंदाज लावला होता. करीनाची टीम आणि तिची नणंद सबा पटौदी यांनी हे दावे त्वरित फेटाळून लावले होते. आता करीनानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर फोटो शेअर केला , ज्यामध्ये एक व्यक्ती आपले फुगलेले पोट दाखवताना दिसत आहे. या पोस्टवर ‘हम आपके हैं कौन..!’ चित्रपटातील ‘चॉकलेट लाइम ज्यूस’ हे गाणे वाजताना ऐकू येते. त्यासोबत स्टोरीवर हसण्याचे, पिझ्झाचे इमोजी वापरले आहेत. तसेच त्या स्टोरीवर ‘हट ना बे’ असे देखील लिहिले आहे.
View this post on Instagram
त्यानंतर आता पापाराझींनी या गैरसमजाबद्दल अभिनेत्रीची माफी मागितली, ज्यावर करीनाची मजेशीर प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये करीना यलो शर्ट आणि ब्लॅक ट्राउझरमध्ये स्टायलिश दिसत आहे. फोटोग्राफर्स तिला म्हणतात, ‘सॉरी करीना जी’. यावर ती हसत उत्तर देते, ‘वेडे करून सोडता तुम्ही लोक’.’
करीना कपूर लवकरच ‘दायरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:





