Jailer 2 OTT : रजनीकांतचा ‘जेलर २’ आता ओटीटीवर पाहता येणार; तारीख जाहीर
Jailer 2 OTT : रजनीकांतचा ‘जेलर २’ हा चित्रपट आता ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार

Jailer 2 OTT : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मोठ्या यशानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.
जागतिक आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ८०० कोटींहून अधिक गल्ला जमावलेला रजनीकांतचा ‘जेलर २’ हा चित्रपट आता ओटीटीवर घरबसल्या पाहता येणार आहे.
View this post on Instagram
प्राइम व्हिडीओने सोशल मीडियामार्फत पोस्ट शेअर करत या चित्रपटाची माहिती शेअर केली आहे. “टायगर मुथुवेल पांडियन पुन्हा एकदा परतला आहे. अधिक दमदार अंदाजात” अशी कॅप्शन देत त्यांनी ही घोषणा केली.
रजनीकांत यांचा ‘जेलर २’ हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरपासून प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हिंदीतही पाहता येणार आहे.
नेल्सन दिलीपकुमार यांनी दिग्दर्शन केलेल्या या अॅक्शन क्राइम ड्रामा चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन यांनी केली आहे. या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा निवृत्त जेलर टायगर मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत आहेत.
या चित्रपटात मोहनलाल, हृतिक रोशन आणि विजय सेतुपती यांच्यासह एस. जे. सूर्या, शिवराजकुमार, सूरज वेंजारामूडू, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, रम्या कृष्णन, नामो नारायण आणि योगी बाबू यांसारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
विशेष म्हणजे, वयाच्या ७५ व्या वर्षीही रजनीकांत यांच्याबद्दल असलेली चाहत्यांची उत्सुकता आणि त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पुन्हा एकदा चर्चेत आला. ‘जेलर २’ चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचेही चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले.
हेही वाचा:




