Bipasha Basu : बिपाशा बासू वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्यास होणार सज्ज
Bipasha Basu : बिपाशा ६ वर्षांनी करणार अभिनय क्षेत्रात कमबॅक

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बासू सहा वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 2022 मध्ये बिपाशाने मुलगी देवीला जन्म दिल्यानंतर काही काळ आता ती सिनेक्षेत्रापासून दूर राहिली. मात्र आता बिपाशा वेब सिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज होणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी वेब सीरीजमध्ये बिपाशा बसू एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, बिपाशा बासूच्या आगामी वेब सीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता करत आहेत. त्यांनी ‘शाहिद’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता.
बिपाशाव्यतिरिक्त, या सीरिजमध्ये अभिनेता सनी कौशल जो कतरिना कैफचा दीर आहे हा देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या सीरीजमध्ये सनी कौशल एका प्रामाणिक पोलिसाच्या भूमिकेत आहे, जो सिस्टीममधील आणि सिस्टिमबाहेरील लोकांशी संघर्ष करताना दिसणार आहे.
बिपाशा बासूने ‘राज’, ‘जिस्म’, ‘नो एंट्री’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘रेस’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. थ्रिलर आणि हॉरर चित्रपटांमधील तिच्या उत्तम कामगिरीसाठी तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
बिपाशा बासूला अभिनेता आणि तिचे पती करण सिंग ग्रोवरच्या क्राइम थ्रिलर वेबसिरीज डेंजरस मध्ये शेवटची भूमिका साकारताना पाहिले होते. ती वेबसिरीज 2020 मध्ये ओटीटी वर प्रदर्शित केली होती. मात्र आता बिपाशा तब्बल ६ वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करत असल्याने चाहत्यांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
Aadi Anant Teaser : आजोबा-नातवाच्या नात्याची धमाल गोष्ट! ‘आदि अनंत’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला





