The Dirty Picture 2: ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटाचा सिक्वेल येणार; एकता कपूरने दिली अपडेट
The Dirty Picture 2: एकता कपूरने केली 'द डर्टी पिक्चर २'ची घोषणा

The Dirty Picture 2: अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यातील तिचा बोल्ड अंदाज विशेष चर्चेत राहिला. हा सिनेमा विद्याच्या करिअरमध्ये सर्वात महत्वाचा ठरला.
एकता कपूरने या सिनेमाची निर्मिती केली होती. तर मिलन लुथरिया यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. आता तब्बल 15 वर्षानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली आहे.
या सिनेमाच्या पार्ट २ची स्वत: एकता कपूरने ही माहिती दिली आहे. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये एकता कपूरने ‘द डर्टी पिक्चर २’ची घोषणा केली. सिनेमाचं कामही सुरु झाल्याचं तिने सांगितलं.
एकता म्हणाली, “मी सध्या एका मोठ्या सिनेमावर काम करत आहे. ‘द डर्ची पिक्चर २’ या सिनेमाचा मी १५ वर्षांनंतर प्लॅन करत आहे आणि मला वाटतं यावेळी माझ्याकडे जी कहाणी आहे ती मला सांगायची आहे. सीक्वेलमध्येही एका महिलेचीच कहाणी असणार आहे.” मात्र यामध्ये मुख्य अभिनेत्री कोण असणार याची माहिती तिने दिलेली नाही.
दरम्यान, २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटात विद्या बालन यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी आणि तुषार कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता यांच्या जीवनापासून प्रेरित होता. सिल्क स्मिता यांनी आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत ४५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते आणि वयाच्या ३५ व्या वर्षी चेन्नईमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली होती.
हेही वाचा:






