Bollywood News । अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या टॅलेंटने इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावले. तिला एक्सप्रेशन क्वीन म्हणतात. माधुरीचे चित्रपट आणि गाणी खूप प्रेक्षकांना आजही खूप आवडतात. आता माधुरी ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटात दिसणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
माधुरी सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.यावेळी तिने तिच्या लहापणीचा खिसा शेअर केला आहे. एका मुलाखतीत माधुरीने सांगितले होते की, लहानपणी एकदा दिवाळीच्या वेळी तिचा अपघात झाला होता. या घटनेने ती खूप घाबरली होती. दिवाळीला ती तिच्या मैत्रिणींसोबत फटाके फोडत होती. तेव्हा त्याच्या एका मित्राने तिचा हातात फटाका ठेवला. काय होणार आहे याची माधुरीला काहीच कल्पना नव्हती.
फटाके पेटवल्याने माधुरीचे केस जळाले. यानंतर माधुरीच्या पालकांना तिचे मुंडन करून घ्यावे लागले आणि त्यामुळे तिला बाहेर जाता आले नाही. केस परत येण्यास बराच वेळ लागला, त्यामुळे तिचे कुटुंब तणावात होते. या घटनेने माधुरीला घाबरली होती. माधुरीने पुन्हा फटाके फोडणे बंद केले होते. आता माधुरी फटाके न फोडता दिवाळी साजरी करते.
माधुरीच्या ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालनसारखे कलाकार आहेत. भूल भुलैया 3 मधील माधुरी दीक्षित आणि विद्या बालनचे गाणे व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत.