Salman Khan : पापाराझींसोबत वाद होताच सलमान खानने उचललं टोकाचं पाऊल? इन्स्टाग्राम अकाउंट झाले गायब, नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या इंस्टाग्राम अकाउंटबाबत सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही वेळासाठी त्याचे अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइल दिसेनासे झाले

Salman Khan | instagram : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या इंस्टाग्राम अकाउंटबाबत सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. काही वेळासाठी त्याचे अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइल दिसेनासे झाले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण झाली.
मात्र काही वेळानंतर अकाउंट पुन्हा पूर्ववत दिसू लागल्याने परिस्थिती स्पष्ट झाली आहे. नुकतेच, पपाराझींवर संतापल्यानंतर अभिनेत्याने काही क्रिप्टिक (गूढ) पोस्ट केल्या होत्या, त्याची देखील चंगली चर्चा झाली होती.
नेमकं काय घडलं? (Salman Khan)
सोशल मीडियावरील चर्चेनुसार, काही युजर्सना सलमान खानचे इंस्टाग्राम प्रोफाइल सर्च करताना “हे पेज उपलब्ध नाही” असा मेसेज दिसला होता. यामुळे अनेकांनी त्याचे अकाउंट हॅक झाले की डिलीट झाले, किंवा तात्पुरते डीअॅक्टिव्हेट केले गेले असावे, अशा शक्यता व्यक्त केल्या.

Salman Khan : पापाराझींसोबत वाद होताच सलमान खानने उचललं टोकाचं पाऊल? इन्स्टाग्राम अकाउंट झाले गायब, नेमकं काय घडलं?
या घटनेचे स्क्रीनशॉट्स काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र सुमारे काही वेळानंतर त्याचे अकाउंट पुन्हा सामान्यपणे दिसू लागले.
अधिकृत प्रतिक्रिया काय आहे? (Salman Khan)
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही घटना तांत्रिक अडचणीमुळे झाली होती की इतर कोणत्या कारणामुळे, हे स्पष्ट नाही.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर सलमान खानचे ७२ दशलक्षाहून (72 Million) अधिक फॉलोअर्स आहेत. तो नेहमी या प्लॅटफॉर्मवर आपले चित्रपट, फिटनेस रुटीन आणि कुटुंबासोबतच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
सोशल मीडियावरील चर्चा : (Salman Khan)
अकाउंट काही काळासाठी गायब झाल्यानंतर चाहत्यांनी ‘एक्स’ (Twitter) आणि इतर प्लॅटफॉर्मवर याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा केली. काहींनी ही तांत्रिक बिघाडाची शक्यता असल्याचे म्हटले, तर काहींनी सुरक्षेच्या दृष्टीने हॅकिंगचा संशय व्यक्त केला.
सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून तो “भाईजान” या नावाने ओळखला जातो.
तो अभिनयासोबतच फिटनेस, सामाजिक कार्य आणि ‘बिइंग ह्युमन’ या फाउंडेशनमुळेही प्रसिद्ध आहे. त्याचे इंस्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स असून तो आपल्या चित्रपटांचे अपडेट्स, वैयक्तिक क्षण आणि फिटनेस संबंधित पोस्ट्स शेअर करत असतो.





