Deool band 2 : पहाटे साडेपाचच्या शोलाच हाऊसफुल्ल गर्दी; ‘देऊळ बंद २’ सिनेमाची तूफान कमाई, प्रेक्षक झाले स्वामीमय !
'देऊळ बंद २' अखेर गुरुवारी, २१ मे रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Deool band 2 box office collection – मराठी चित्रपटसृष्टीत मोठी उत्सुकता निर्माण करणारा ‘देऊळ बंद २’ अखेर गुरुवारी, २१ मे रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
तब्बल ११ वर्षांनंतर ‘देऊळ बंद’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Deool band 2)
गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत गुरुवारी पहाटे ६ वाजता चित्रपटाचा पहिला शो ठेवण्यात आला होता. या पहाटेच्या शोसाठी पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच प्रेक्षकांनी थिएटरबाहेर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. (Deool band 2)
देशभरातील जवळपास ५०० सिनेमागृहांमध्ये ‘देऊळ बंद २’चे २००० हून अधिक शो प्रदर्शित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सकाळी साडेपाच वाजताच्या पहाटेच्या शोला देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी झाल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागासह शहरांमध्येही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने निर्मात्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब मानली जात आहे.
View this post on Instagram
बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत बोलायचे झाल्यास, ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या अहवालानुसार ‘देऊळ बंद २’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशभरात सुमारे ३.१६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
तर चित्रपटाचे नेट कलेक्शन अंदाजे २.६८ कोटी रुपये इतके झाले आहे. मराठी चित्रपटासाठी ही ओपनिंग दमदार मानली जात असून येत्या विकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Deool band 2)
प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथानकातून शेतकरी आत्महत्या, सामाजिक वास्तव आणि व्यवस्थेतील प्रश्नांवर भाष्य करण्यात आले आहे.
चित्रपटात स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई आणि महेश मांजरेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत. (Deool band 2)
सामाजिक विषयाला व्यावसायिक सिनेमाची जोड देत ‘देऊळ बंद २’ प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.





