Kira Advani । अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांतून आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले. कियारा लवकरच ‘डॉन 3’ या मोस्ट अवेटेड चित्रपटात रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटातील कियाराची भूमिका जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘डॉन 3’मध्ये कियारा अडवाणी मुख्य भूमिकेसाठी मोठी फी वसूल केली आहे. पोर्टनुसार, कियारा अडवाणी फरहान अख्तरच्या चित्रपटासाठी 13 कोटी रुपये इतकी मोठी फी घेत आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला मिळालेली ही सर्वात मोठी फी असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अशात आता या चित्रपटातील तिच्या लुकची चर्चाही सर्वत्र होत आहे. या चित्रपटासाठी तिने नुकतीच हेअरस्टाईल केली आहे. कियाराचीही हेअरस्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रिपोर्टनुसार यात ती ‘जंगली कॅट’च्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्राला शोभेल अशीच ही हेअरस्टाईल असल्याचे बोलले जात आहे. ‘डॉन ३’मध्ये पहिल्यांदाच दिसणार रणवीर-कियारा जोडी कियारा अडवाणीच्या ‘डॉन 3’ मध्ये सहभागाची घोषणा फेब्रुवारी 2023 मध्ये करण्यात आली होती. ती रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि कियारा ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. अलीकडे, कियाराने देखील या फ्रँचायझीमध्ये सामील होण्याबद्दल बोलली आहे, जेव्हा तिने उघड केले की प्रेक्षकांनी तिला आतापर्यंत ज्या प्रकारे पाहिले आहे त्यापेक्षा वेगळा होण्यासाठी तिने मुद्दाम हा चित्रपट साइन करण्याचा निर्णय घेतला आहे.