‘वेदा’मध्ये अभिनेत्री तमन्ना – जॉनची दिसणार केमिस्ट्री

Bollywood News | अभिनेता जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘वेदा’चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ फुल ऑन ॲक्शन अवतारात दिसत आहे. टीझरमध्ये शर्वरी वाघ व्यवस्थेविरोधात आवाज उठवताना दिसत आहे. जॉन अब्राहम तिच्या संरक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन्ही स्टार्सचा सामना खलनायक अभिषेक बॅनर्जीशी होणार आहे.
View this post on Instagram
‘वेदा च्या टीझरची सुरुवात शर्वरी वाघच्या ॲक्शन लोडेड अवताराने होते. जी आपल्या हक्कासाठी लढताना दिसत आहे. यानंतर जॉन अब्राहमची एंट्री येते जो म्हणतो,’मला कसे लढायचे ते माहित नाही यानंतर जेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याची ओळख विचारली तेव्हा त्याने स्वतःला बाप म्हणतो. ‘वेदा’च्या टीझरमध्ये तमन्ना भाटियाची झलकही पाहायला मिळते. या चित्रपटात तमन्ना आणि जॉनची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
झी स्टुडिओ निर्मित ‘वेदा’ या ॲक्शनपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले आहे. जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. ‘वेदा’ यावर्षी १२ जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. जॉन अब्राहम दीड वर्षांनी ‘वेदा’च्या माध्यमातून पडद्यावर परतणार आहे. हा अभिनेता अखेरचा शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ या चित्रपटात दिसला होता. जॉन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता आणि हा चित्रपट पडद्यावर हिट ठरला होता.
हे वाचाल का ? शिल्पा शेट्टीचा ड्रेस पाहून युजर्स म्हणाले,”उर्फीची बहीण…”





