bollywood new । सरगुन मेहता बेबी प्लॅनिंगच्या प्रश्नावरून चिडली

bollywood news । टीव्हीमध्ये काम केल्यानंतर सरगुन मेहता आता पंजाबची प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माता बनली आहे. सध्या सरगुन पती अभिनेता रवी दुबेसोबतच्या तिच्या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. दोघांचे ‘वे हनेया’ हे गाणे सुपरहिट झाले आहे. सोशल मीडियावर लोक त्या रोमँटिक गाण्यावर रील बनवत आहे.
या जोडप्याने 2013 मध्ये लग्न केले आणि दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहे. अशात आता सोशल मीडियावर लोक तिला बेबी प्लॅनिंगबद्दल विचारत आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सरगुनला बेबी प्लॅनिंगबद्दल बद्दल विचारण्यात आले, जावर तिने उत्तर दिले.
सरगुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुलाखत घेणाऱ्या मुलाच्या प्रश्नाला उत्तर देताना दिसत आहे. लोकांना तिच्या बेबी प्लॅनिंगबद्दल जाणून घ्यायचे आहे. “हा जनतेचा प्रश्न आहे, तुझा काय प्लॅन आहे, इतकी वर्षे वाट पाहिली, मी सुद्धा तुला बघत मोठा झालो आहे.”
हे ऐकून सरगुन म्हणते, “पण या प्रश्नाचा तुम्हा लोकांशी काय संबंध आहे किंवा जनतेचाही याच्याशी काय संबंध आहे.” जेव्हा आम्हाला योग्य वेळ वाटेल तेव्हा आणि ती वेळ अजून आलेली नाही, तेव्हा आम्ही विचार करु. ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक कमेंट करत आहेत. सरगुनने 12/24 करोल बाग या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने पंजाबी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि लवकरच ती निर्माताही बनली.
हेही वाचा
Bullet Temple। भारतातील एक मंदिर जिथे बुलेट गाडीची केली जाते पूजा; वाचा काय आहे रंजक कथा





