“बॉलीवूड खूप वाईट…”; इरफान खान यांचा लेक बाबिल ढसाढसा रडला

Babil Khan | दिवंगत अभिनेता इरफान खानचा लेक बाबिल खान एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये बाबिल खान रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो बॉलिवूड इंडस्ट्री आणि कलाकाराबद्दल खळबळजनक विधाने केली होती. घराणेशाही, गटबाजी यावर बोलताना तो ढसाढसा रडला. ज्यानंतर चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली.
मात्र काही वेळातच त्याचं इंस्टाग्राम डिलीट झालं. त्यावर त्याच्या टीमने स्पष्टीकरण देतं व्हिडीओ चुकीचा असल्याचं निवेदन जाहीर केलं. यानंतर बाबिल पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर परतला आणि त्याने ज्या सेलिब्रिटीजची नावे घेतली होती त्या सगळ्यांची माफी मागितली. या सगळ्या गोंधळामुळे नेटिझन्स संभ्रमात पडले.
बाबिल काय म्हणाला होता?
बाबिल व्हिडीओमध्ये म्हणाला की, “शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजित सिंग असे बरेच लोक आहेत. अजून बरीच नावे आहेत, बॉलीवूड वाईट आहे. बॉलीवूड ही एक अतिशय फेक इंडस्ट्री आहे, ज्याचा मी देखील एक भाग आहे. काहींची अशी इच्छा आहे की बॉलीवूड चांगलं व्हावं, पण ते मूर्खपणाचं आहे. माझ्याकडे तुम्हाला दाखवायला खूप काही आहे,” असे बोलून बाबिल जोरजोरात रडू लागला. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना बाबिलबाबत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र काही वेळातच त्याचं इंस्टाग्राम डिलीट झालं.
त्यानंतर बाबिल इंस्टाग्रामवर परत आला. त्याने सेलिब्रिटीजच्या नावाने पोस्ट शेअर केल्या आणि त्यांची माफी मागितली. तसेच या व्हिडिओमध्ये त्याने त्याला रडण्यावरून ट्रोल करणाऱ्यांवर टीका केली.
बाबिलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, २०२२ मध्ये ‘काला’ चित्रपटातून बाबिलने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. २०२३ मध्ये तो ‘द रेल्वे मेन’मध्ये दिसला होता. अलीकडेच त्याचा ‘लॉगआउट’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे. Babil Khan |
हेही वाचा:
Nagpur Accident : नागपुरात तिहेरी अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, जखमीची प्रकृती चिंताजनक





