बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन रिलेशनशिपमुळे चर्चेत

Kriti Sanon । बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननने तिच्या सोशल मीडियावर जबरदस्त फोटो शेअर केले आहे. पण यावेळी कृति तिच्या फोटोमुळे नाहीत तर रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये ती तिचा कथित बॉयफ्रेंड कबीरसोबत दिसत आहे.
कृतिने नुकताच तिचा 34 वा वाढदिवस साजरा केला. ग्रीसमध्ये तिची बहीण नुपूर आणि तिच्या खास मित्रासोबत तिने आपल्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी साजरी केली. या फोटोतील एका व्यक्तीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. यामध्ये कृति तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत दिसत आहे.
कृति तिचा कथित बॉयफ्रेंड कबीरसोबत दिसल्यामुळे चर्चेत आहे. कृति कबीर बहियासोबत डिनर डेट एन्जॉय करताना दिसत आहे. तसेच ती कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया डान्स करतांना दिसत आहे. तिच्या लव्ह लाईफनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृती ब्रिटनमधील बिझनेसमन कबीर बहियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या अफवांवर तिने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
क्रिती सेननच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची क्रू या चित्रपटात दिसली होती. ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर तिचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ज्यामध्ये हाऊसफुल 5, भेडिया 2, सेकंड इंग्लिश आणि दो पट्टी सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.





