बॅालिवूड अभिनेत्रीच्या फेटनेसची चर्चा! अवघ्या तरुणाईला केलं घायाळ, पाहा फोटोशूट…

Avneet Kaur : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत फिटनेस ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे. सिनेमा इंडस्ट्रीतील अवेळी काम पाहता या सगळ्यातून थोडा वेळ काढून फेटनेस करणं गरजेच आहे. एका बॅालिवूड अभिनेत्रीने तिचा फिटनेस मंत्रा सांगितला आहे. बॉलिवूडमध्ये एका ‘फिटनेस फ्रिक’ अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिने सोशल मीडियावर केलेलं फोटोशूट चर्चेला विषय ठरत आहे.
ती अभिनेत्री म्हणजे बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेली आणि आता बॅालिवूड सिनेमात चमकणारी अभिनेत्री अनवीत कौर. या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच अवनीतने जिम सेशनमधील काही फोटो, व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत.
तिच्या फोटोशूटमुळे ती कमालीची फिट आणि तितकीच हॉट दिसत आहे. तिचे फॅन्सदेखील तिच्या फिटनेसवर फिदा झालेत आहेत. अवघ्या २३ व्या वर्षी अनवीत कौर हिने आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
View this post on Instagram
याद्वारे तिने फेटनेसची आयुष्यात असलेलं महत्व अधोरिखेत केलं आहे. क्रिकेटर विराट कोहलीने अवनीत कौरच्या फॅन पेजवरील फोटोला लाईक केल्यामुळे तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर अवनीत कौर चर्चेत आली. तसेच ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अवनीत कौर हिने प्रसिद्ध हॅालिवूड अभिनेता टॉम क्रूझसोबत भेट घेतली होती. तिने त्याच्यासोबतचा भेटीचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
हेही वाचा : गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणावरून राजकीय वादंग; रिक्षाचालक कुटुंबाचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन





