BMC Election 2026 : रामदास आठवलेंचा भाजपला जोरदार धक्का, 39 वॉर्डात उमेदवार उतरवले रिंगणात

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत मोठे नाट्य घडले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महायुतीच्या जागावाटपात झालेल्या कथित विश्वासघाताचा आरोप करत स्वतंत्र लढत जाहीर केली आहे. रिपाईने मुंबईतील ३९ वॉर्डांमध्ये उमेदवार रिंगणात उतरवले असून, ही यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रामदास आठवले यांनी सांगितले की, महायुतीने रिपाईला ७ जागा देण्याचे आश्वासन दिले होते, पण भाजपच्या १३७ आणि शिवसेनेच्या ९० जागांच्या वाटपात रिपाईला एकही जागा मिळाली नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यामुळे आठवले यांनी “विश्वासघात” आणि “अपमान” असा गंभीर आरोप करत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतील दलित आणि आंबेडकरी समाज असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये रिपाईचे प्रभावी उमेदवार उतरवण्यात आले आहेत. या वॉर्डांमध्ये महायुतीसाठी मतांचे विभाजन होऊ शकते, कारण १००-२०० मतांचाही फरक निर्णायक ठरू शकतो.
महायुतीसाठी डोकेदुखी
आठवले यांच्या या निर्णयामुळे भाजप आणि शिंदे गटाला मुंबईतील दलित मतदाराच्या समर्थनात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता महायुतीकडून रिपाईला पुन्हा सोबत घेण्यासाठी काय पावले उचलली जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी
स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
हेमलता सुनिल मोरे- ११८, ईशान्य मुंबई
राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
रेश्मा अबु खान, ५४ उत्तर मुंबई
छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
बाबू अशापा धनगर, ६३- उत्तर पश्चिम
वंदना संजय बोरोडे, ३८- उत्तर पश्चिम
राधा अशोक यादव, ३९- उत्तर पश्चिम
प्रेमलता जितेंद्र शर्मा, ४०- उत्तर पश्चिम
धनराज वैद्यनाथ रोडे,४३- उत्तर पश्चिम
शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150





