चेहऱ्यावर रक्त अन् धडकी भरवणारी नजर… सिद्धार्थ जाधवचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील खतरनाक लुक

Siddharth Jadhav | ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचे नुकतेच नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटातील त्याचा लूक उलगडण्यात आला आहे. त्याचा यातील जबरदस्त लुक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. Siddharth Jadhav |
चेहऱ्यावर रक्त, व्रण, धडकी भरवणारी नजर असं खतरनाक रूप असलेला सिद्धार्थ जाधव या पोस्टरमध्ये दिसत आहे. सिद्धार्थचा कधीही न पाहिलेला लुक यात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या लूकमुळे त्याची यात नेमकी काय भूमिका असेल याबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणतो, ”या भूमिकेबद्दल सांगायचं तर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटातील माझी ही भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमधली सगळ्यात वेगळी आहे. माझ्या या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांचं आहे. त्यांनी मला माझा एक फोटो पाठवायला सांगितला आणि त्यावर काम करून माझा हा लूक तयार केला.
View this post on Instagram
पुढे म्हणाला, “जेव्हा हा लूक माझ्याकडे आला, तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मला पडला. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीच साकारली नाही. या मी भूमिकेविषयी जास्त काही बोलू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच आवडेल,” असा विश्वासही त्याने व्यक्त केला. Siddharth Jadhav |
दरम्यान, महेश मांजरेकर यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. Siddharth Jadhav |
हेही वाचा :





