Siddharth Jadhav: ‘शुक्रिया सेठ ….काम देने के लिए नही…’; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी पोस्ट
Siddharth Jadhav : सिद्धार्थने 17 एप्रिल 2026 रोजी ही वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Siddharth Jadhav : मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ( Siddharth Jadhav) नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने अलिकडेच या वेब सिरीजसाठी काम करत असतानाची झलक पोस्टद्वारे सोशल मीडियात शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने नागराज मंजुळेंचे आभार मानले आहे.
सिद्धार्थने 17 एप्रिल 2026 रोजी ही वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सिद्धार्थने म्हंटले की, ‘नागराज मंजुळे भावा. तुझ्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराची असते. आज मटका किंग या वेबसिरीजच्या निमित्ताने माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे. Siddharth Jadhav
View this post on Instagram
माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज ती ही तुझ्या दिग्दर्शनाखाली दगडू विचारे नावाचं पात्र तू मला साकारायला दिलेस माझ्यावर विश्वास टाकलास. ॲमेझॉन प्राईम सारखा प्लॅटफॉर्म, सिद्धार्थ रॉय कपूर, अश्विनी मॅम ,यांच्यासारखे निर्माते आणि विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवरसर, भरत जाधव सर, भूपेंद्र जडावत, गिरीश कुलकर्णी सर, किशोर कदम सर, आणि अशा मात्तबर कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली.’
सिद्धार्थने नागराज मंजुळेंचे आभार व्यक्त करत म्हंटले की, ‘कलाकाराला प्रत्येक वेळेला चांगलं काम करायची संधी हवी असते आणि कुणीतरी तो विश्वास टाकावा अशी त्याची इच्छा असते. म्हणून तूच लिहलेला डायलॉग तुलाच सारखं सारखं ऐकवतो…शुक्रिया सेठ ….काम देने के लिए नही…भरोसा रखने के लिये…आपला सिद्धू…’, असं म्हणत सिद्धार्थने नागराज यांच्यासोबतचे सेटवरील फोटो शेअर केले. (Siddharth Jadhav)
हेही वाचा:





