Siddharth Jadhav : ‘एवढी कसली घाई?’ सिद्धार्थ जाधवने ‘ती’ बातमी पाहताच केली ठणठणीत पोस्ट
Siddharth Jadhav : स्वतःच्याच मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर सिद्धार्थ जाधव थक्क झाला

Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि कॉमेडीच्या अचूक टाईमिंगसाठी तो खास करुन ओळखला जातो.
मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मिडियावर सिद्धार्थने स्वतःच्याच मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर तो थक्क झाला आहे. याप्रकरणी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
सिद्धार्थ याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये युट्यूब चॅनल दिसत आहे. ज्यावर लिहिलं आहे की, ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज… गंभीर आजार…’, अशात स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये अभिनेता म्हणाला, ‘”नमस्कार, मी ठणठणीत बरा आहे. व्यवस्थित ॲनिमलचे प्रयोग, धिंगाणाचं शूट सुरू आहे. ज्या ज्या लोकांनी काळजीने मेसेज/ कॉल केलेत. त्यांना मनापासून धन्यवाद…बातमीदार जरा मलातरी विचारा..एवढी कसली घाई आहे तुम्हाला.??? Siddharth Jadhav
पुढे त्याने म्हंटले, “ज्याने हेडलाइन दिलीये त्याला तर नोबेल द्याच. Man is a more dangerous Animal than an “ANIMAL” त्यांचं जाऊ दे. निदान माझ्या नाटकाचं तरी प्रमोशन करतो. न्यूजवाले या माझ्या नाटकाला २६ ऑगस्ट रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजीमंदिर दादरला”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सध्या सिद्धार्थ ‘अॅनिमल’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. Siddharth Jadhav
हेही वाचा:





