लांडेवाडीत रक्तदान, किराणा किट वाटप

मंचर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिव-सानिमित्त लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबिर आणि 2500 मोफत किराणा किट वाटपाचा शुभारंभ शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
रक्तदात्यांची मोफत करोना ऍन्टिजेन रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्यांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख माउली कटके, जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, जिल्हा समन्वयक रवींद्र करंजखेले, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, रवींद्र वळसे पाटील,
युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रवीण थोरात पाटील, उपजिल्हा युवा अधिकारी कल्पेश बाणखेले, तालुका युवा अधिकारी धनेश मोरडे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, महेश ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, ग्राहक संरक्षक कक्षाचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव राजगुरू, लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे, चांडोलीच्या सरपंच प्रीती थोरात, महिला आघाडी उपजिल्हा संघटक मालती थोरात, हेमलता मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक सोशल डिस्टन्सचे योग्य पालन करत उपस्थित होते.





