Satara | शहीद पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ वडूज येथे आज रक्तदान शिबिर
Updated On:

वडूज, – २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ वडूज पोलीस ठाणे व आयुष ब्लड बँकेच्या वतीने मंगळवार २६ नोव्हेंबर रोजी वडूज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथे २६/११ रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे, संदीप उन्नीकृष्णन हे पोलीस अधिकारी शहीद झाले होते.
त्यांचे कृतिशील स्मरण करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पोलीस व रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, आयुष ब्लड बँकेचे संचालक संजय रायबोळे यांनी केले आहे.





