विशाखापट्टणममध्ये स्टील कारखान्यात स्फोट, 10 जण जखमी
Updated On:

विशाखापट्टणम – विशाखापट्टणमधील एका स्टील प्लॅन्टमध्ये झालेल्या स्फोटात किमान 10 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर कारखान्यात लागलेली आग विझवण्यात आली असून तपासासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. शनिवारी दुपारी झालेल्या या स्फोटानंतर परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्टील प्लॅन्टमध्ये द्रवरुप लोखंडाच्या घटकांचा स्फोट झाला. या स्फोटात किमान 10 जण गंभीर जखमी झाले. उकळता लोहरस या कामगारांच्या अंगावर सांडल्याने हे कामगार जखमी झाले. या जखमींना स्टील प्लॅन्टच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघाजणांची प्रकृती गंभीर आहे. “सीआयएसएफ’चे पथक स्फोटाच्या कारणांचा तपास करत असून या स्फोटाबाबत अधिक माहिती मिळणे बाकी आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.





