Rambo Russo Cash : फायटिंग रिंगआधी स्टेजवर पैशांचा पाऊस! रॅम्बो रुसोने हवेत उडवले हजारो डॉलर्सचे बंडल्स; VIDEO होतोय व्हायरल
Rambo Russo Cash : जियानकार्लोस रिवेराविरुद्धच्या सामन्यापूर्वी, मॅट रॅम्बो-रुसो शेकडो डॉलर्सच्या नोटांचे बंडल उधळल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

BKFC Fighter Rambo Russo Throws Dollar Bundles On Stage Ahead Of Giancarlo Rivera Fight : ‘बेअर नकल फायटिंग चॅम्पियनशिप’ (BKFC) मधील बहुचर्चित लढतीपूर्वी अमेरिकन फायटर रॅम्बो रुसोने (Rambo Russo) केलेल्या एका अजब कृत्यामुळे क्रीडाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू जियानकार्लोस रिवेरा (Giancarlo Rivera) याच्याविरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी रुसो स्टेजवर नोटांची बंडले भरलेली बॅग घेऊन पोहोचला. त्यानंतर त्याने एका मिनिटापेक्षा जास्त वेळ स्टेजवर हजारो डॉलर्सच्या नोटा हवेत उडवून पैशांचा पाऊस पाडला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रतिस्पर्ध्याला डिवचण्यासाठी पैशांची बरसात; पब्लिसिटी स्टंट ठरला चर्चेचा विषय –
रॅम्बो रुसोने स्टेजवर अशा प्रकारे पैसे उडवण्यामागील मुख्य उद्देश लोकप्रियता मिळवणे आणि प्रतिस्पर्धी रिवेराला मानसिकदृष्ट्या डिवचणे हाच होता. वजन मोजण्याच्या (फेस-ऑफ) कार्यक्रमात दोघांमध्ये आधीपासूनच जोरदार शाब्दिक युद्ध सुरू होते. बॉक्सिंग आणि कॉम्बॅट स्पोर्ट्समध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी खेळाडू अनेकदा अशा युक्त्या लढवतात. रुसोच्या या कृतीनंतर रिवेरानेही त्याला रिंगमध्ये धडा शिकवण्याचा इशारा दिला असून दोघांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
🤣 Felony Charles Bennett just jumped off the stage to grab the money Rambo Russo threw at the prior face off 🤣#BKFC93 | Tomorrow Night on BKFC+ pic.twitter.com/ds1g3IKOab
— Bare Knuckle FC (@bareknucklefc) September 10, 2026
शनिवारी सकाळी हायव्होल्टेज मुकाबला; दोघांच्या नावावर जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड –
Rambo Russo was making them dollars fly 🤣💸#BKFC93 | Tomorrow | Watch on BKFC+ pic.twitter.com/SvGl7zNwEW
— Bare Knuckle FC (@bareknucklefc) September 11, 2026
रॅम्बो रुसो आणि जियानकार्लोस रिवेरा यांच्यातील हा अटीतटीचा मुकाबला अमेरिकेत उशिरा रात्री रंगणार असून भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी याचा अंतिम निकाल समोर येईल. रुसोने आतापर्यंत खेळलेल्या ५ पैकी ४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर रिवेराने आपले तिन्ही सामने जिंकून रिंगमध्ये अजिंक्य राहण्याचा पराक्रम केला आहे. दोन्ही फायटर्सचा आक्रमक स्वभाव पाहता या सामन्यात थरार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
नेमकी काय असते ‘बेअर नकल बॉक्सिंग’?; ग्लोव्ह्जशिवाय खेळला जातो क्रूर खेळ!
Rambo Russo is BACK this weekend & he’s coming to take OVER! 💥#BKFC93 | September 11 | Watch on BKFC+ pic.twitter.com/p4KTRnl6TH
— Bare Knuckle FC (@bareknucklefc) September 8, 2026
बेअर नकल बॉक्सिंग हा पारंपरिक बॉक्सिंगपेक्षा अत्यंत वेगळा आणि धोकादायक खेळ मानला जातो. यात खेळाडू कोणत्याही प्रकारचे ग्लोव्ह्ज न घालता अनवाणी हातांनी थेट ठोसे मारतात. शिवाय, रिंगचा आकार चौकोनी नसून वर्तुळाकार (गोल) असतो, ज्यामुळे कोणालाही कोपऱ्यात लपून बचाव करण्याची संधी मिळत नाही. याच अत्यंत आक्रमक आणि रोमहर्षक नियमांमुळे हा खेळ जगभरातील चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.





