Harshwardhan Sapkal : टिपू सुलतान नावाने मार्ग करण्याचा प्रस्ताव भाजपचाच, सपकाळांनी दाखवले पुरावे, “तुम्हाला लाज वाटतेय का?” म्हणत फडणविसांना प्रत्युत्तर
Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानानंतर भाजप आक्रमक. पुण्यात कॉँग्रेस-भाजपमध्ये जोरदार राडा देखील झाला.
Harshwardhan Sapkal : मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचे चित्र बसवण्यापासून या प्रकरणाची सुरुवात झाली, ज्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला. यादरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून वादाला आणखी खतपाणी घातले.
“टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होते एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असे विधान हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal ) यांनी केले होते.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानानंतर भाजप आक्रमक झाली. पुण्यात यावरून कॉँग्रेस-भाजपमध्ये जोरदार राडा देखील झाला. हर्षवर्धन सपकाळ यांनी जे विधान केले, त्याबद्दल त्यांना लाज वाटायला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. Harshwardhan Sapkal
मात्र आता हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील भाजपला प्रत्युत्तर देत थेट टिपू सुलतान मार्ग करण्याचा प्रस्ताव भाजपनेच केला असल्याचा पुरावा सादर केला आहे. Harshwardhan Sapkal
हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट
हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटतेय का? असा थेट सवाल केला आहे. “२०१३ मध्ये मुंबईतील एम/पूर्व’ विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरु होऊन रफीनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्र. ४ ह्यास ‘शहीद टिपु सुलतान मार्ग’ असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडून देण्यात आला होता. Harshwardhan Sapkal
BMC च्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून तो मंजूर झाला तेव्हा आताच्या महापौर श्रीमती रितू तावडे समितीच्या सदस्या होत्या. आणि या ठरावाला अनुमोदक होते आताचे भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम,” असे म्हणत सपकाळ यांनी महापौर तावडे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष साटम यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटतेय का, राज्यात दंगली घडवण्यासाठी आपण व आपल्या पक्षाचे नेते प्रोत्साहन देत आहात, एका वक्तव्याचा विपर्यास करून राज्य जाळायला आपण तयार झाला आहात.
आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहोत, या जबाबदारीचे तरी भान राखा. आणि भाजपच्या गुंडांना दंगली घडवण्यासाठी प्रोत्साहन देणं थांबवा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे विसरू नका, राज्यातील जनतेला गुण्यागोविंदानं जगू द्या,” असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. Harshwardhan Sapkal
हेही वाचा:
Online Abuse Prevention: पुण्यात ऑनलाईन अत्याचार प्रतिबंध आणि कायदेशीर प्रतिसादावर कार्यशाळा






