Online Abuse Prevention: पुण्यात ऑनलाईन अत्याचार प्रतिबंध आणि कायदेशीर प्रतिसादावर कार्यशाळा
या कार्यशाळेत प्रशिक्षक उमा सुब्रमणियन, सलमान मुजावर आणि रितू जैन यांनी ऑनलाईन धोके, गुन्हेगारांचे वर्तन, पीडितांचे अनुभव आणि तक्रार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. प्रोजेक्टर सादरीकरण, रोल प्ले आणि संवादात्मक चर्चेद्वारे विषय प्रभावीपणे मांडण्यात आला.

पुणे, दि. 15 फेब्रुवारी 2025: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे शहर शाखा आणि रती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी फाऊंडेशन येथे “ऑनलाईन शोषण, रिपोर्टिंग प्रणाली, कायदेशीर प्रतिसाद व पीडितांसोबत कसे काम करावे” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत प्रशिक्षक उमा सुब्रमणियन, सलमान मुजावर आणि रितू जैन यांनी ऑनलाईन धोके, गुन्हेगारांचे वर्तन, पीडितांचे अनुभव आणि तक्रार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. प्रोजेक्टर सादरीकरण, रोल प्ले आणि संवादात्मक चर्चेद्वारे विषय प्रभावीपणे मांडण्यात आला.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण येथील 48 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचा उद्देश ऑनलाईन अत्याचारांविरोधात सजगता निर्माण करणे, पीडितांना सक्षम मदत देणे आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती पोहोचवणे हा होता.
कार्यक्रमाचा समारोप सहभागींच्या मनोगतांनंतर करण्यात आला.