Chandigarh Mayor Election : चंदीगडचे महापौरपद 1 मताच्या फरकाने भाजपकडे

चंदीगड – चंदीगडच्या महापौरपदावर भाजपचे उमेदवार अनुप गुप्ता निवडून आले आहेत. ही निवडणूक त्यांनी एका मताच्या फरकाने जिंकली आहे. या निवडणुकीत गुप्ता यांना 15 मते तर आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला 14 मते मिळाली.
कॉंग्रेस आणि अकालीदलाने या मतदानावर बहिष्कार घातला होता. या महापालिकेत भाजप आणि आप यांचे प्रत्येकी 14 नगरसेवक आहेत. तथापि चंदीगडच्या भाजपच्या खासदार किरण खेर यांनाही या निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार आहे त्या आधारावर भाजपचा उमेदवार विजयी झाला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/45-thousand-900-crore-investment-in-the-state-on-the-first-day-in-davos-about-10-thousand-direct-employment-opportunities/
या निवडणुकीत आम आदमी पक्षाने जसवीरसिंग लड्डी यांना उमेदवारी दिली होती. गेल्यावेळीही या ठिकाणच्या महापौर पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपने अगदी थोड्या फरकाने बाजी मारली होती.





