Committee Election Result : दिल्ली स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजप विजयी

Committee Election Result – दिल्ली महानगरपालिकेच्या १८ सदस्यीय स्थायी समितीची शेवटची रिक्त जागा भारतीय जनता पार्टीने बिनविरोध जिंकली. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
भाजपचे उमेदवार सुंदर सिंह यांना पक्षाच्या सर्व ११५ नगरसेवकांची मते मिळाली, तर आपच्या निर्मला कुमारी यांना एकही मत मिळाले नाही. स्थायी समिती ही दिल्ली महानगरपालिकेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे भाजपच्या पॅनलमध्ये आता 10 सदस्य आहेत तर सत्ताधारी आपचे केवळ आठ सदस्य आहेत.
कमलजीत सेहरावत खासदार झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांच्या सहभागाशिवाय ही पहिलीच निवडणूक झाली. भाजपचे नगरसेवक कमलजीत सेहरावत पश्चिम दिल्लीतून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.





