भाजपला पुन्हा बहुमत मिळेल – रावसाहेब दानवे

मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात युतीला 42 च्या वरच जागा मिळतील, 41 होणार नाहीत. तसंच देशात भाजप 300 जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

काल पासून अनेक वाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए पुन्हा ससत्तेच्या जवळ जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावर रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यातील समान जागेमुळे भाजप आणि शिवसेना आता मोठे-छोटे नाही तर जुळे भाऊ झाल्याचे चित्र सर्वत्र उमटले असल्याचे दिसून येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×