MCD प्रभाग समिती निवडणुकीत भाजपने फडकवला विजयाचा झेंडा, ‘आप’ला मोठा धक्का; कोण जिंकले?

नवी दिल्ली – दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) प्रभाग समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 12 पैकी 7 झोन जिंकून विजयाचा झेंडा फडकावला आहे. बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या निवडणुकीचा निकाल सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत जाहीर झाला. ज्यामध्ये भाजपने आम आदमी पार्टीचा पराभव करत विजयाची नोंद केली. आम आदमी पक्षाला या निवडणुकांमध्ये जोरदार झटका बसला आणि त्यांना केवळ 5 झोनमध्ये विजय मिळवता आला.
या निवडणुकीत, नगरसेवकांनी 12 पैकी 9 झोन स्तरीय प्रभाग समित्यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्थायी समिती (MCD ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था) प्रत्येकी एक सदस्य निवडण्यासाठी मतदान केले. तीन झोनमध्ये मतदान झाले नाही कारण भाजप किंवा आप दोघांनीही आपले उमेदवार उभे केले नाहीत.
कोणत्या झोनमध्ये कोणता पक्ष जिंकला:
1. केशवपुरम झोन- भाजप
2. शहर एसपी झोन- आप
3. करोल बाग झोन- आप
4. रोहिणी झोन- आप
5. नजफगड झोन- भाजप
6. शाहदरा झोन (दक्षिण)- भाजप
7. पश्चिम क्षेत्र- आप
8. शाहदरा झोन (उत्तर)- भाजपा
9. दक्षिण विभाग- आप
10. सिव्हिल लाइन झोन- भाजप
11. मध्य क्षेत्र- भाजप
12. नरेला झोन- भाजप
New representatives elected!
🗳️Wards Committee Election Results – Narela Zone. #mcd #election #ward pic.twitter.com/VYEbP5QGuM
— Municipal Corporation of Delhi (@MCD_Delhi) September 4, 2024





