दिल्लीपाठोपाठ गुजरातमध्येही काँग्रेसचा ‘सुपडा साफ’, पालिका निवडणुकीत भाजपचा मोठा विजय; PM मोदी म्हणाले…

Gujarat Local Body Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवला होता. जवळपास 27 वर्षांनी भाजप दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. आता दिल्ली पाठोपाठ गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
सध्या गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने 68 पैकी 60 नगरपालिका आणि सर्व 3 तालुका पंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जवळपास 15 नगरपालिकेत विजय मिळवण्याची कामगिरी देखील भाजपने केली आहे. काँग्रेस पक्षाला फक्त एकाच नगरपालिकेत विजय मिळवता आला आहे. तर समाजवादी पक्ष दोन नगरपालिकांमध्ये विजयी झाला आहे.
गुजरातमध्ये 16 फेब्रुवारीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुजरातमधील मतदारांचे आभार मानले.
गुजरात का भाजपा से रिश्ता ना सिर्फ अटूट है, बल्कि उसमें लगातार और मजबूती आ रही है!
राज्य में हुए निकाय चुनाव में भाजपा को अपना भरपूर समर्थन और आशीर्वाद देने के लिए मैं गुजरात की जनता-जनार्दन का हृदय से आभार व्यक्त करता हूं। यह विकास की राजनीति की एक और बड़ी जीत है। इससे हमारे…
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2025
भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत पंतप्रधान मोदींनी एक्सवर (ट्विटर) लिहिले की, ‘गुजरातचा भाजपशी असलेला संबंध ना केवळ अटूट आहे, तर तो सतत अधिक मजबूत होत आहे. राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला भरभरून पाठिंबा आणि आशिर्वाद दिल्याबद्दल मी गुजरातच्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. हा विकासाच्या राजकारणातील आणखी एक मोठा विजय आहे. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना अधिक उत्साहाने लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, ज्यांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांमुळे हा भव्य विजय शक्य झाला आहे.’
महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत निवडणुकांमधील जवळपास 2,165 जागांपैकी 1,600 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर काँग्रेसला जवळपास 260 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर आप, समाजवादी पक्ष व अपक्षांनाही काही जागा मिळाल्या आहेत.
दरम्यान, जूनागड महानगरपालिकेतही भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. .या पक्षाने 60 पैकी 48 जागा जिंकल्या. काँग्रेस 11 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी आले, तर एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे.





