नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोग आज दुपारी १२ वाजता दिल्लीतील आकाशवाणी भवनच्या रंगभवन सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषदेत मोरबी पुल दुर्घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर त्यांनी गुजरात निवडणूकसंदर्भात भाष्य केलं. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणुक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
गुजरातमध्ये ४.९ करोड मतदान होणार आहे. महिलांसाठी १२७४ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासांठी खास १८२ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
गुजरात निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक पहा
अधिसूचना तारीख – 5 नोव्हेंबर (पहिला टप्पा) आणि 10 नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
नामांकन तारीख – १४ नोव्हेंबर (पहिला टप्पा), १७ नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
नामांकनाची छाननी तारीख – १५ नोव्हेंबर (पहिला टप्पा), १८ नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख- १७ नोव्हेंबर (पहिला टप्पा), २१ नोव्हेंबर (दुसरा टप्पा)
निवडणुकीची तारीख-
पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला मतदान
दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे
गुजरात निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे
10 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण