निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये पुन्हा गोंधळ! नंदीग्राममध्ये भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, टीएमसीविरोधात पक्षाचे आंदोलन

BJP Protest in Bengal । लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकलाय. राज्यातील नंदीग्राममध्ये भाजप-टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची बातमी समोर आली आहे. नंदीग्राममध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा भाजपने केला आहे. या संदर्भात आज भाजपने नंदीग्राम येथे निषेध मोर्चा काढला. टीएमसीने हल्ल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, भाजपने,”नंदीग्राममधील हिंसाचारात जखमी झालेल्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, टीएमसीने हिंसाचारात सहभाग असल्याचा इन्कार केला आहे. पक्षाचे म्हणणे आहे की भाजप कार्यकर्त्यांमध्ये भांडणे झाली होती, ज्यामुळे ते एकमेकांशी भिडले. पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहता अनेक टप्प्यांत निवडणुका होत आहेत.
नंदीग्राममध्ये भाजपचे रास्तारोको BJP Protest in Bengal ।
भाजप कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याबाबत पक्ष रस्त्यावर उतरला असून नंदीग्राममध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. भाजपने नंदीग्राममध्येही बंद पुकारला आहे. शहर पोलीस ठाण्याबाहेरही निदर्शने करण्यात येत आहेत. नंदीग्राम हे तमलुक लोकसभा मतदारसंघांतर्गत येते, जिथे 25 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी झालेल्या हिंसाचाराचा परिणाम निवडणुकीवरही दिसून येतो.
16th May, 2024 – Mamata Banerjee, at a rally in Haldia, threatened to take revenge for her defeat in Nandigram. She lost to BJP’s Suvendu Adhikari, but still shamelessly took over as Chief Minister.
On 23rd May, 2024 – BJP worker Rathibala Arhi is murdered in Nandigram.
— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) May 23, 2024
‘प्रक्षोभक वक्तव्यासाठी ममतांना जबाबदार धरावे’ BJP Protest in Bengal ।
भाजप नेते आणि पश्चिम बंगालचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी नंदीग्राममधील हिंसाचारावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते म्हणाले, “लोकशाहीत अशा प्रकारचा हिंसाचार पूर्णपणे स्वीकार्य नाही. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या प्रक्षोभक विधानांसाठी आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरले पाहिजे. आम्ही लढा देऊ आणि रतिबाला आणि सर्व पीडितांना न्याय मिळवून देऊ.” स्थानिक युनिटने 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे, पण ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर निवडणूक आयोग कधी कारवाई करणार?





