‘पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती’ ; भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

BJP On West Bengal । पश्चिम बंगालमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल भाजपने चिंता व्यक्त केली आहे. भाजपने अलिकडच्या काळात झालेल्या हिंसक घटनांकडे लक्ष वेधले आहे. ज्यामुळे राज्यातील रहिवासी घाबरले असल्याची माहितीसमोर येत आहे.
अशांततेवर नियंत्रण ठेवण्यात ममता अपयशी BJP On West Bengal ।
भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वाढत्या अशांततेवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांनी लिहिले, बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. हे बांगलादेशात घडणाऱ्या हिंसक घटनांसारखेच होत चालले आहे.” असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुर्शिदाबाद घटनेवर प्रतिक्रिया BJP On West Bengal ।
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसक घटनेनंतर अमित मालवीय यांचे हे विधान आले आहे. त्यांनी नवादा ब्लॉकमधील पातिकाबारी बाजारात ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी हिंदूंच्या मालकीच्या दुकानांची आणि मालमत्तांची तोडफोड आणि आग कशी लावली याचे वर्णन केले.
The law and order situation in West Bengal is spiraling out of control, rapidly resembling the chaos seen in Bangladesh.
Just a few hours ago, Mamata Banerjee’s extremist supporters vandalized and set fire to shops and properties owned by Hindus at Patikabari Bazar in Nawda… pic.twitter.com/yf7r1g1t1I
— Amit Malviya (@amitmalviya) March 9, 2025
अमित मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये,”काही तासांपूर्वीच, ममता बॅनर्जी यांच्या अतिरेकी समर्थकांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नवादा ब्लॉकमध्ये हिंदूंच्या दुकानांची आणि मालमत्तांची तोडफोड केली आणि आग लावली. ही एक वेगळी घटना नाही. गेल्या ४८ तासांत मंदिरांची विटंबना झाल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत, ज्या हिंसाचाराचे व्यापक स्वरूप अधोरेखित करतात.” असे म्हटले आहे.
हेही वाचा
मोठी बातमी ! माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीचे छापे ; सकाळपासून अनेक ठिकाणी धाडसत्र
रोशनी नाडर बनल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका ; वाचा नेमक्या कोण आहेत रोशनी अन् संपत्ती किती आहे ?





