रेहान वाड्राच्या लग्नाच्या बातम्यांवर भाजपची खोचक प्रतिक्रिया ; म्हणाले, “आता मामांनीही करून टाकावं मग सर्व काही…”

BJP on Rahul Gandhi। राजस्थान सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुमित गोदारा यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांचे पुत्र आणि केरळमधील वायनाड येथील खासदार रेहान वाड्रा यांच्या साखरपुड्याच्या बातमीवर भाष्य केले आहे. गोदारा यांनी सल्ला दिला की रेहानचे काका राहुल गांधी यांनीही लग्न करावे.
मंत्री सुमित गोदारा यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना,” राहुल गांधी (रायबरेलीचे खासदार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते) यांनीही लग्न करावे. त्यांनीही यावेळी साखरपुडा करावा” असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. पुढे गोदारा म्हणाले की, एकदा राहुल गांधींचे लग्न झाले की त्यांचं सगळं व्यवस्थित होईल. सध्या त्यांचे वाईट दिवस सुरु आहेत, परंतु लग्नानंतर त्यांचे चांगले दिवस येतील” असे त्यांनी म्हटले आहे.
रेहान वाड्रा यांचा त्यांची प्रेयसी अवीवा बेगशी लवकरच विवाह होणार आहे. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला सहमती दर्शवली आहे. रेहान आणि अवीवा दोघेही छायाचित्रकार आहेत. मात्र, या बातम्यांवर वाड्रा कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
अवीवा बेग कोण आहे? BJP on Rahul Gandhi।
अवीवा बेग ही दिल्लीस्थित छायाचित्रकार आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून पत्रकारिता आणि संवाद माध्यमाचा अभ्यास केला आहे. दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून तिचे ह्युमॅनिटीज विषयांचे शिक्षण पूर्ण केले. ती अटेलियर ११ ची सह-संस्थापक आहे, जी एक फोटोग्राफिक स्टुडिओ आणि उत्पादन कंपनी आहे जी भारतातील एजन्सी, ब्रँड आणि क्लायंटसोबत काम करते. तिचे छायाचित्रण दैनंदिन जीवनाचे चित्रण करते.
रेहान वड्रा काय करतो? BJP on Rahul Gandhi।
प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मोठा मुलगा रेहान वाड्रा एक छायाचित्रकार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रेहान आणि अवीवा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच दोन्ही कुटुंबांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.





