BJP News : छत्तीसगडमधील अंबिकापुर-रायगड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४३ वर शुक्रवारी रात्री एका भीषण अपघातात (BJP News) भाजपचे बूथ अध्यक्ष शिवमंगल दास (वय ५०) यांचा मृत्यू झाला. शांतिपारा परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते ट्रकखाली अडकून सुमारे २० मीटरपर्यंत फरफटत गेले, ज्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बतौली तालुक्यातील पोकसरी गावचे रहिवासी (BJP News) शिवमंगल दास हे शुक्रवारी दुपारनंतर काही कामानिमित्त बतौली येथे आले होते. रात्री सुमारे ९.३० वाजता ते दुचाकीने घरी परतत असताना शांतिपारा जवळ ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, ते रस्त्यावर कोसळल्यानंतर ट्रकने त्यांना २० मीटरपर्यंत ओढत नेले. (BJP News) BJP News स्थानिकांनी तातडीने मदत करत ११२ आपत्कालीन सेवेद्वारे त्यांना जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र अंतर्गत गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिकांना ट्रकचा नंबर नोंदवता आला नाही. पोलिस कारवाई (BJP News) बतौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे ट्रकचा शोध घेण्यात येत आहे. शनिवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिवमंगल दास यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप पक्षात (BJP News) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन सांत्वन व्यक्त केले. अनेक नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून दास यांच्या अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहण्याचे ठरवले आहे.