BJP News : मोठी बातमी..! भाजप खासदाराचा राजीनामा; अंदमान-निकोबारच्या नायब राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारणार
BJP News : उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिनेश शर्मा यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

BJP News : उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते दिनेश शर्मा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता ते अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नव्या भूमिकेत दिसणार आहेत. (BJP News)
दिनेश शर्मा यांनी शुक्रवारी राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राज्यसभेतील एक जागा रिक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. (BJP News)
दिनेश शर्मा यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपणार होती. मात्र, नायब राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. (BJP News)

६२ वर्षीय दिनेश शर्मा यांच्याकडे राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच त्यांची अंदमान आणि निकोबारच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता शर्मा प्रशासकीय क्षेत्रातील नव्या जबाबदारीची धुरा सांभाळणार आहेत. (BJP News)
BJP News : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का; बार कौन्सिल निवडणुकीत TMC चे एकहाती वर्चस्व




