मोठी बातमी ! भाजप खासदाराला न्यायालयाने सुनावली 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.. खासदारकी जाणार ?

नवी दिल्ली – भाजप खासदाराला एका मॉलमधील कंपनीची तोडफोड केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा एमपी-एमएलए न्यायालयाने सुनावण्यात आली आहे.राम शंकर कथेरिया असं या खासदाराचे नाव असून ते उत्तर प्रदेशातील इटावा भागाचे नेतृत्व करतात. न्यायालयाने कलम १४७ आणि ३२३ अंतर्गत दोषी ठरवत खासदाराला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली.
2011-12 मध्ये टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप कथेरिया यांच्यावर होता. आग्रा येथील साकेत मॉलमध्ये टोरेंट पॉवर लिमिटेडचे कार्यालय होते. त्या दरम्यान मॅनेजर भावेश रसिक लाल शहा हे वीजचोरीच्या प्रकरणांवर लक्ष देत होते. स्थानिक खासदार राम शंकर कथेरिया यांच्यासह आलेल्या 10 ते 15 समर्थकांनी रसिक शाह यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली. यादरम्यान त्यांनी टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाचीही तोडफोड केली.
कथेरिया उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत
या प्रकरणात भाजप खासदाराला कलम 147 प्रकरणी दोन वर्ष आणि कलम 323 मध्ये एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राम शंकर कथेरिया हे इटावा विधानसभेचे खासदार आहेत. न्यायालयाने शिक्षा घोषित केल्यानंतर भाजप खासदार राम शंकर कथेरिया म्हणाले की, मी नेहमीप्रमाणे न्यायालयात हजर झालो. न्यायालयाने आज माझ्या विरोधात निकाल दिला आहे. मी न्यायालयाचा आदर करतो, मला अपील करण्याचा अधिकार आहे आणि मी तो वापरेन.
खासदार जाऊ शकते
लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 नुसार, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास खासदार किंवा आमदाराचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. याशिवाय शिक्षा भोगल्यानंतर सहा वर्षांच्या कालावधीत निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची तरतूद आहे. उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर संसदेचे सदस्यत्व जाऊ शकते.





