Brij Bhushan Singh’s challenge to Raj Thackeray : ” ….तर त्यांना पेलू शकणार नाही”; दुबेंनंतर आणखी एका भाजप नेत्याच राज ठाकरेंना खुल आव्हान

Brij Bhushan Singh’s challenge to Raj Thackeray : राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून मोठे राजकारण तापले आहे. भाजप नेते आणि खासदार शशिकांत दुबे यांनी याविषयी भाष्य करताना मराठी विरोधी वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच दुबेंनी राज ठाकरेंना आव्हान देणारे दखील विधान केले होते. आता भाजपच्या आणखी एका खासदाराने राज ठाकरेंना डिवचलं आहे.
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उत्तर भारतीयांमध्ये खूप राग आहे. यामुळे उत्तर भारतीयांमधील एखाद्या मोठ्या व्यक्तीने राज ठाकरे यांना आव्हान दिले तर ते पेलू शकणार नाही, असे विधान केले आहे. त्यामुळे राजकारण करा, परंतु भाषा, जाती, धर्म यांना आधार घेऊ नका, असा सल्ला देखील बृजभूषण यांनी राज ठाकरेंना दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
भाषा जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांचे जे नाते आहे, ते तुमच्या या प्रकारामुळे तुटणार नाही, असेही बृजभूषण म्हणाले आहेत. बृजभूषण यांनी राज ठाकरेंचा अयोध्या दौऱ्याविषयीची आठवण सांगत त्यांना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला. परंतु आता पुन्हा आपले रंग दाखवत आहेत, अशी टीकाही त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
पुढे काय होणार?
५ जुलै या दिवशी मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनंतर एका मंचावर पाहायाला मिळाले. या क्षणांची त्यांचे समर्थक गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, तो क्षण अखेर सत्यात उतरला आणि ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाले. उद्धव ठाकरेंकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत दिले असले तरी, राज ठाकरेंनी याविषयी स्पष्ट भाष्य केलेले नाही. यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षाची युती होते की आणखी काही वेगळं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





