Narayan Rane Admitted In Hospital | भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज गुरूवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नेमकी त्यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार, ते काल जसलोक रुग्णालयात दाखल झाले आहेत. नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी अशी आशा ते व्यक्त करत आहेत. Narayan Rane Admitted In Hospital | नारायण राणे भाजपचे नेते आहेत. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते काँग्रेस आणि शिवसेनेत होते. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये आल्यानंतर ते केंद्रीय मंत्री देखील झाले. नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक आहेत. ते नेहमी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देखील पाहायला मिळतात. Narayan Rane Admitted In Hospital | हेही वाचा: Leopard attack | दौंडकरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ ; 16 करडांचा मृत्यू