BJP MLC Candidate List : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र; शिक्षक-पदवीधरसाठी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर; ‘हे’ नवखे चेहरे मैदानात
BJP MLC Candidate List : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

BJP MLC Candidate List : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. (BJP MLC Candidate List)
भाजपच्या यादीत पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा समावेश आहे. (BJP MLC Candidate List)
भाजपचे तीन उमेदवार कोण?
पुणे विभाग पदवीधर : डॉ. स्मिता योगेश जाधव
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी या जागेसाठी शरद लाड यांच्या नावाची चर्चा होती; मात्र पक्षाने अखेर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. (BJP MLC Candidate List)
नागपूर विभाग पदवीधर : सुधाकर विठ्ठलराव कोहळे
नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांचे आव्हान असणार आहे. कोहळे आणि माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. (BJP MLC Candidate List)
पुणे विभाग शिक्षक : कौस्तुभ मुरलीधर गावडे
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. गावडे हे कोल्हापुरातील विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे वृत्त आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून चर्चा सुरू होती. अखेर भाजपने गावडे यांच्या नावाची घोषणा केली. (BJP MLC Candidate List)
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाकडे लक्ष
भाजपच्या या घोषणेमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. विशेषतः पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघात पक्षाने अपेक्षेपेक्षा वेगळी नावे दिल्याने या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. (BJP MLC Candidate List)
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील एकूण पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी होणार असून मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. (BJP MLC Candidate List)
भाजपने तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उर्वरित पक्षांची भूमिका आणि या मतदारसंघांतील अंतिम लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (BJP MLC Candidate List)






