Maharashtra Election : भाजपा उमेदवार सुरेश धस यांनी जनतेला दिले अजब आश्वासन; म्हणाले…

बीड : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. हे नेते आरोप – प्रत्यारोपांसह जनेतला आश्वासन देताना दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सुरेश धस यांनी काय दिले आश्वासन ?
सुरेश धस हे भाजपाकडून आष्टी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर ते दररोज गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रचार करत आहेत. मात्र, त्यांनी एका सभेत बोलताना शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं आणि त्याचीच चर्चा संध्या रंगली आहे. “मला मतदान करा, एक डुक्कर सुद्धा जिवंत ठेवणार नाही”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना दिलेल्या एका अजब आश्वासनाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.





