खळबळजनक ! भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या
Updated On:

बुलडाणा : बुलढाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजय गिरी असे आत्महत्या करणाऱ्या बॉडीगार्डचे नाव आहे. अजय गिरी यांनी त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
अजय गिरी पोलीस वसाहतीमध्ये राहत होते, त्यांनी घरगुती कारणावरून जीवन संपवल्याचे समजत आहे. ते मागच्या काही दिवसांपासून भाजप आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. श्वेता महाले या बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.





