Bjp Leader : कर्जत वृक्षतोडीवरून भाजप नेत्याचा पक्षाला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ
Bjp Leader : रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील भीमाशंकरच्या संवेदनशील जंगल पट्ट्यात उभारल्या जाणाऱ्या 'टोरंट' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरून राजकीय आणि पर्यावरण वर्तुळात प्रचंड संताप उसळला आहे.

Bjp Leader : टोरंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प रायगडमधील कर्जत आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर जंगलात होत आहे. यासाठी तब्बल 32 हजारांहून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. गंभीर बाब म्हणजे शेकडो वृक्षांची तोड सुरू झाल्यानंतर रायगडसह राज्यभरातून या प्रकल्पाला विरोध सुरू झाला. (Bjp Leader)
त्यातच भाजपचे कार्यकर्ते असलेले पर्यावरणप्रेमी अॅ़ड. ऋषिकेश जोशी यांनी पक्षाला रामराम केला आहे. या प्रकल्पाबाबत त्यांनी अनेक आक्षेप नोंदवले. जंगलात 400 हून अधिक प्राण्यांच्या प्रजाती, 50 विविध साप, दुर्मीळ शेकरूचे अस्तित्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. (Bjp Leader)
तसेच घनदाट जंगल असताना प्रकल्पासाठी सादर केलेल्या अहवालात वृक्षांऐवजी झुडपे असल्याचा खोटा उल्लेख केल्याचा दावाही त्यांनी केला. यावरून भाजप हा प्रकल्प लादत असल्याचे उघड होत आहे. (Bjp Leader)
BJP Leader : ऐन दिवाळीत भाजपच्या बड्या नेत्याचं निधन; राजकारणात शोककळा





