भाजपचे नेते नवीन जिंदाल यांची घोड्यावरून मतदान केंद्रावर एन्ट्री; व्यक्त केला मोठा विश्वास

Haryana Election 2024 | हरियाणामध्ये आज 5 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, भूपेंद्र सिंग हुडा आणि काँग्रेसचे विनेश फोगट, जेजेपीचे दुष्यंत चौटाला आणि अन्य 1027 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजप नवीन जिंदाल यांनी देखील आज हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. मात्र मतदान केंद्रावर थेट घोड्यावर आल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नवीन जिंदाल काय म्हणाले ?
कुरुक्षेत्र, हरियाणाचे भाजप खासदार जिंदाल यांनी मतदान केल्यानंतर सांगितले, “लोकांमध्ये खूप उत्साह आहे. मला विश्वास आहे की हरियाणातील धाडसी आणि जागरूक लोक त्यांचे आशीर्वाद भाजपला देतील आणि नायब सिंग सैनी पुन्हा मुख्यमंत्री होतील.”
#WATCH | Haryana: BJP MP Naveen Jindal reaches a polling station in Kurukshetra on a horse, to cast his vote for the Haryana Assembly elections. pic.twitter.com/cIIyKHXg0n
— ANI (@ANI) October 5, 2024
ते म्हणाले, “मी येथे घोड्यावर स्वार होऊन आलो आहे कारण ते शुभ मानले जाते. त्यामुळे कामात यश मिळतं. भाजपचा विजय पक्का आहे, याची खात्री असल्यामुळेच मी घोड्यावर बसून मतदानासाठी आलो. माझी आई सावित्री जिंदाल हिसारमधून निवडणूक लढवत आहे. त्यांना हिसारसाठी खूप काही करायचे आहे. त्यामुळे कोणाला निवडून आणायचे हे हिसारचे लोक ठरवतील.”
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या चेहऱ्याबद्दल विचारले असता जिंदाल म्हणाले, “अनिल विज आमच्या पक्षाचे खूप मोठे नेते आहेत आणि मुख्यमंत्री कोण होणार हे काळच सांगेल. एखाद्या मोठ्या नेत्याच्या मनात काही असेल तर, त्याला ते सांगण्याचा अधिकार आहे.”
हेही वाचा :





